भिवापूर: भिवापूर तालुक्यातील जवळी येथे भारतीय जनता पार्टीची बूथस्तरीय बैठक संपन्न
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ जवळी येथे आज बूथस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला आमदार मा. डॉ. राजीवजी पोतदार यांच्यासह उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन, बूथस्तरावरील संघटनात्मक तयारी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय यावर यावेळी चर्चा करण्यात आली.