मातोश्री 11 धाराशिव क्रिकेट
संघ विजेता; अजित पाटील कव्हेकरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान
लातूर, दि. 03 सप्टेंबर 2026 :
भाजपा युवा नेते तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील गुरू हॉटेल ग्राऊंडवर विशाल गायकवाड यांच्या पुढाकारातून तालुकास्तरीय व गावनिहाय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला क्रिकेटप्रेमी तसेच युवा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मातोश्री 11 धाराशिव संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. या विजयी संघाला ट्रॉफी व 41 हजार रुपयांचा धनादेश भाजपा युवा नेते तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या हस्ते मजगे नगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी विशाल गायकवाड, अशोक ढोपरे, विक्की रणदिवे, आशिष कांबळे, सादिकभाई शेख, सिद्धेश्वर बिराजदार, पंकज सुरवसे, डॉ. परमेश्वर शिंदे, इमाम शेख, अनिल आडे, आवेश सिद्दिकी, वैभव भांडेकर, अनिरुद्ध इंगळे, कार्तिक चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर एव्ही 11 लातूर संघाने द्वितीय क्रमांक मिळविला असून, या संघाला 21 हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गावनिहाय आयोजित क्रिकेट स्पर्धेत विजयी झालेल्या जिमखाना क्रिकेट क्लब, किनगाव संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाला 31 हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली. तर लोकमान्य क्रिकेट क्लब, पानचिंचोली संघाने द्वितीय क्रमांक मिळविला असून, या संघाला 11 हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला लातूर शहर व परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार - अजित पाटील कव्हेकर
ग्रामीण तसेच शहरी भागात युवा खेळाडूंची संख्या मोठी असून, त्यांच्यामध्ये उत्तम गुणवत्ता, जिद्द आणि खेळाची प्रचंड आवड आहे. या गुणवत्तेला योग्य सुविधा, व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून दिल्यास शहरी व ग्रामीण भागातील मातीतून अनेक उत्तम खेळाडू घडू शकतात. त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहोत. या माध्यमातून शहर आणि ग्रामीण भागातून भविष्यात अनेक गुणवंत खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली.
Latur, Latur | Sep 4, 2026