बहुजन विकास अभियानाचे 'डंका आंदोलन'; भूयार गटार योजनेच्या निकृष्ट कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी / प्राईम लाईव्ह न्युज वृत्तसेवा:
बहुजन विकास अभियानाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'डंका आंदोलन' छेडण्यात आले. २७ जुलै २०२५ पासून सुरु असलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलकांनी हा एल्गार पुकारला आहे.
महापालिका क्षेत्रातील म.न.पा. भूयार गटार योजने अंतर्गत झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून, या कामांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे व दोषींवर कडक कारवाई करावी, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे आणि निदर्शनांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जोपर्यंत दोषी ठेकेदारावर कारवाई होत नाही आणि कामाची योग्य चौकशी होत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा बहुजन विकास अभियान प्रमूख संजयकुमार कांबळे यांनी दिला आहे
Latur, Latur | Sep 21, 2026