लिंगायत समाजातील युवक-युवतींसाठी अमृत योजनेचा मार्ग मोकळा
प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवा संघटनेने केलेल्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील युवक-युवतींसाठी अमृत योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
समाजातील गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि इतर क्षेत्रांतील सुमारे १०० विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे.
शिवा संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाला या योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहातील संधी उपलब्ध होणार असून, समाजातील युवक-युवतींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्राध्यापक मनोहर धोंडे रा अध्यक्ष शिवा संघटना
Latur, Latur | Sep 21, 2026