शहादा: शहादा - दोंडाईचा रस्त्यावरील राधिका कॉटन जवळ तिहेरी अपघात, दुचाकीवरील २ जण जखमी
शहादा दोंडाईचा रस्त्यावरील राधिका कॉटन जवळ तिहेरी अपघात झाल्याने यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात दुचाकी वरील दोन जण जखमी झाले आहेत.या तिहेरी अपघातामध्ये भरधाव ट्राल्याने कारला जबर धडक देत तसेच दुचाकीलाही धडक बसल्याने दुचाकी चक्काचूर झाली आहे.यामध्ये दुचाकी वरील दोन जण जखमी झाले आहेत.