जाफराबाद: टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर सुरू असलेल्या उपोषण स्थळी गटविकास अधिकारी यांनी भेट दिली,मात्र तोडगा ऐवजी वाद घालून निघून गेल
आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद ता.टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील तरुण व काही नागरिकांनी काल दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी आमरण उपोषण सुरू केली आहे या उपोषण स्थळी दुपारच्या वेळी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी जाफराबाद गटविकास अधिकारी बारगिरी यांनी भेट दिली असता त्यांनी उपोषणकर्त्यांची समाज काढण्या ऐवजी त्यांच्याशी वाद घालून उपोषण स्थळावरून निघून गेल्याचा व्हिडिओ समोर आला असून यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.