सडक अर्जुनी: दारूच्या नशेत मोटारसायकल चालवणाऱ्यावर डुग्गीपार पोलिसांची कारवाई
डुग्गीपार पोलिसांनी गोंदिया परिसरात दारूच्या नशेत मोटारसायकल चालवणाऱ्या २३ वर्षीय तुषार कापगतेला पकडले. कोहमारा ते गोंदिया मार्गावर ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ७:२० ते ७:४५ दरम्यान झाली. आरोपीविरोधात कलम १८५ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.