लातूर: -शहरातील सर्वात वर्दळीचा म्हणून ओळखला जाणारा कान्हेरी चौक सध्या वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या चौकात वाहनांची लांबच लांब रांग लागते. रस्त्याच्या आजूबाजूला तसेच सर्व्हिस रोडवर हातगाडी आणि भाजीपाला विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी वाहनांच्या हालचालीस मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.