आरोग्यसेवा थेट नागरिकांपर्यंत… पेंढरी येथे 177 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 08 ऑक्टोबर 2026 रोजी मौजा पेंढरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने 177 नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यापैकी 36 नागरिकांना पुढील तपासणीसाठी विविध रुग्णालयांकडे शिफारस करण्यात आली.
यावेळी फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या विविध नागरी कृती उपक्रमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
आरोग्याची काळजी… विश्वासाची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.
#GadchiroliPolice #HealthCamp #Pendhari #CommunityPolicing #Healthcare PoliceForPeople MaharashtraPolice
@dgpmaharashtra @mramesh_ips @cmomaharashtra_
25 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 8, 2026