अंबरनाथ: अंबरनाथ परिसराच्या लादी नाका येथे एका धावत्या कारला लागली आग, कार जळून खाक
अंबरनाथ पश्चिम परिसरातील लादी नाका येथील मुख्य रस्त्यावर एका धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. अचानक धावत्या कारला आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रसंग अवधान राखत प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवत कार बाहेर पडले. माहिती करताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि टीम घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.