अंबरनाथ: अंबरनाथ येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सहाच्या सुमारास कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांना संबोधित केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना या निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. यासाठी सर्वांना एकत्रित काम करायचे आहे.