अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम फुलेनगर येथे आमदार विकास निधीतून मंजूर झालेल्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन
अंबरनाथ पश्चिम फुलेनगर येथे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या फुलेनगर परिसरातील सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन आज शनिवारी दुपारी १ च्या दरम्यान करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक लेनिन मुक्कू, भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ तालुका कार्यालयीन सचिव संतोष पगारे, फुलेनगर धम्म प्रेरणा बुद्ध विहारचे अध्यक्ष पी. एस.थोरात, सेक्रेटरी सुनीता उबाळे, कोशाध्यक्ष नीलिमा रणदिवे, गुरुजी घेगडमल, प्रकाश भिंगारदिवे, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.