अंबरनाथ: मलंगगड परिसरातील शेकडो तरुणांनी केला शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये पक्षप्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेश केलेल्या सर्व तरुणांचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्षात स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना शिंदे गटातील युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, तालुकाप्रमुख चेनू जाधव व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.