अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व निसर्ग ग्रीन संकुल येथे मोफत आरोग्य तपासणी व डेंटल शिबीराचे आयोजन
आज शनिवारी दुपारी १ वाजता अंबरनाथ पूर्व निसर्ग ग्रीन संकुल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर निसर्ग ग्रीन सामाजिक उत्सव समिती, मेत्ता फाउंडेशन तसेच फोर्टिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व डेंटल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी सोनिया गुरसिंघानी, डॉ. विद्या सातपुते, डॉ. निशा जैस्वार, डॉ. हरीश शहाददपुरी, गुल अडवाणी, डॉ. भूषण साखरे उपस्थित होते.