वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
जयेश वसंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोळवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत जयेश वसंत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास रविंद्र हरी भंडारी, रक्षित गायकर (मनसे सचिव), रोहित रविंद्र भंडारी तसेच मित्रपरिवार उपस्थित होता.
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
Kalyan, Thane | Aug 27, 2026