अंबरनाथ: शहरातील शिवदर्शन अपार्टमेंट येथील घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरी, हिललाईन पोलिसांत गुन्हा दाखल
घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शिवदर्शन अपार्टमेंटजवळ घडली. रवी चिरी याई यांनी आपली दुचाकी रात्री १२ वाजता घरासमोर पार्क केली होती. सकाळी सहाच्या सुमारास हँडल लॉक तोडत चोरट्याने दुचाकी पळवली. त्यानंतर रवी यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.