अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व शिवधाम कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या व्यक्तीची ११ लाख ८७ हजार १२३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक
अंबरनाथ पूर्व शिवधाम कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या धीरज कुमार लालचंद तोलानी यांची पैसे डबल करून नेण्याच्या बहाण्याने तब्बल ११ लाख ८७ हजार १२३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.