अंबरनाथ: कॅम्प नंबर १ शहाड फाटकजवळून कॉपर पाईप चोरीला, उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथ जवळील कॅम्प नंबर १ शहाड फाटकजवळून चोरट्याने कॉपरचा पाईप चोरुन नेल्याची घटना घडली आहे. नितेश ठाकूर यांनी काही कामानिमित्त २० हजार रुपयांचे कॉपरचे पाईप आणले होते. मात्र सदर पाईप हे चोरट्याने चोरुन नेले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.