पालघर: जातिगत जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे राहुल गांधी यांनी लोकसभेतील मागणीचा विजय;बळवंत गावित आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
केंद्र सरकारने जातिगत जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय म्हणजे केंद्रातील सरकारचा नाही तर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सातत्याने जातिगत जनगणने संदर्भात केलेल्या मागणीचा विजय आहे. केंद्र सरकारला नमत घेऊन ही मागणी पूर्ण करावी लागली. देश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालतो अशी प्रतिक्रिया आदिवासी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बळवंत गावी यांनी व्यक्त केली आहे.