ऑपरेशन यू-टर्न’ — शॉर्टकट नको, सुरक्षित प्रवास हवा!
काही मिनिटे वाचवण्यासाठी Wrong Side ने वाहन चालवणे जीवघेणे ठरू शकते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो आणि शहरातील वाहतूकही विस्कळीत होते.
याच पार्श्वभूमीवर गडचिरोली शहर वाहतूक विभागाकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत Wrong Side ने वाहन चालविणाऱ्यांवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासोबतच निर्धारित U-Turn चा वापर आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.
वाहनचालकांनी निर्धारित U-Turn चाच वापर करावा, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावे आणि सुरक्षित वेगमर्यादेचे पालन करावे.
शॉर्टकटच्या नादात Wrong Side नको…
सुरक्षित प्रवासासाठी निर्धारित U-Turnच हवा!
वाहतूक नियम पाळा • स्वतः सुरक्षित रहा • इतरांनाही सुरक्षित ठेवा
#GadchiroliPolice #OperationUTurn #TrafficPolice #RoadSafety #TrafficAwareness WrongSideDriving SafeDriving MaharashtraPolice
@dgpmaharashtra @mramesh_ips @cmomaharashtra_
15 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 6, 2026