सेलू: तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस सेलू पोलिसांनी कोंढाळी येथून ठोकल्या बेड्या
Seloo, Wardha | Sep 27, 2024 लग्नाचे आमिष देत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीस अवघ्या नऊ दिवसांच्या आत ता. 25 बुधवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान सेलू पोलिसांनी कोंढाळी येथून बेड्या ठोकल्या. दुर्गेश गोमाजी वाघधरे वय 22 रा. डिगडोह, जि. नागपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील पीडित मुलीला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. अशी माहिती ता. 27 शुक्रवारला सेलू पोलिसांनी दिली.