सेलू: जुवाडी शिवारात शेतात काम करताना अंगावर वीज कोसळून १ महिला ठार तर, तिघी गंभीर आणि दोघी किरकोळ जखमी
Seloo, Wardha | Sep 26, 2024 शेतात काम करताना अंगावर वीज पडल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज ता. 26 गुरुवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मौजा जुवाडी शेत शिवारात घडली. या दुर्घटनेत तीन शेतमजूर महिला गंभीर तर दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. मंदा प्रभाकर वाघमारे (वय५५) रा. जुवाडी असे मृतक महिला शेतकऱ्याचे नाव आहे. यातील जखमींना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.