कल्याणच्या रोनक सिटीत पार्किंगमधील दुचाकीत शिरला साप; वॉर फाउंडेशनच्या सर्पमित्रांकडून सुखरूप सापाची सुखरूप सुटका
कल्याणमधील रोनक सिटी परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीमध्ये साप शिरल्याची घटना समोर आली . साप आढळताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क साधला.माहिती मिळताच प्राणीमित्र तन्मय माने आणि गौरव निकम यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत शिताफीने सापाला कोणतीही इजा न होऊ देता त्याचा सुखरूप बचाव केला. बचाव करण्यात आलेला सर्प हा दिवड जातीचा पूर्णपणे बिनविषारी सर्प असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली
Kalyan, Thane | Jun 26, 2026