तोंडावर वाघाचा मुखवटा , हातात शस्त्र , कल्याण पूर्वेतील घरफोडीचा CCTV समोर , दोन महिन्यांपूर्वीचा CCTV VIRAL ,आरोपी अजूनही फरार ...
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात एका धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तोंडावर वाघाचे मुखवटे आणि हातात शस्त्र घेऊन चारचाकी गाडीतून आलेले चोरटे इमारतीत शिरल्याचे दृश्य समोर आले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण पूर्वेतील काटेमानवली नाका परिसरातील रॉयल गोल्ड पॅलेस इमारतीत मे महिन्यात घरफोडीची घटना घडली होती. घरमालक कुटुंबासह गावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तब्बल अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये दोन संशयित तोंडावर वाघाचे मुखवटे घालून आणि हातात शस्त्र घेऊन इमारतीत फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या घटनेला दीड महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही आरोपी अद्�
Kalyan, Thane | Jun 27, 2026