अनफाल फाउंडेशनतर्फे मुहर्रम निमित्त बाई रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वितरण उपक्रम
"मानवसेवा हीच खरी इबादत – चला, करूया मदतीचा हात पुढे."- उपक्रमाच्या माध्यमातून दिला संदेश
सामाजिक बांधिलकी जपत अनफाल फाउंडेशनच्या वतीने पवित्र मुहर्रम निमित्त आज बाई रुक्मिणीबाई हॉस्पिटल, कल्याण येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी फळ वितरण उपक्रम उत्साहात व सेवाभावाने पार पडला.
या उपक्रमाद्वारे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना ताजी फळे वितरित करण्यात आली. आजारपणाच्या कठीण काळात रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आधार, आपुलकी आणि दिलासा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे अनफाल फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले.
मुहर्रम हा त्याग, संयम, मानवता आणि सेवाभावाचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. त्या संदेशाला अनुसरून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्�
Kalyan, Thane | Jun 27, 2026