टिटवाळ्यात भरधाव ब्रिझा कारची धडक; तीन अल्पवयीन मुलं जखमी, गाळ्याची भिंतही कोसळली
टिटवाळा येथील इंदिरानगर परिसरात शनिवारी भरधाव वेगाने आलेल्या एमएच 05 TV 2881 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या ब्रिझा कारने तीन अल्पवयीन मुलांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तिन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर आशीर्वाद हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन आनंद (वय 12 वर्षे), अनिकेत कुमार (वय 13 वर्षे) आणि रिषभ शर्मा (वय 13 वर्षे) ही तीन मुले गॅलन घेऊन पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या कडेला पायी जात होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या ब्रेझा कारने त्यांना जोरदार धडक दिली.
धडकेनंतर कारचा ताबा सुटल्याने ती रस्त्यालगत असलेल्या एका गाळ्याला जाऊन धडकली. या धडकेत गाळ्याची भिंतही कोसळली, त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची न
Kalyan, Thane | Jun 27, 2026