पालघर: पोलीस पहा संचालक जाहीर झालेल्या चार पोलीस अधिकारी अमलदारांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे सन्मान
पालघर जिल्हा पोलीस दलातील चार पोलीस अधिकारी अमलदार यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलामध्ये केलेल्या प्रशासनीय गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी पोउपनि. दिनेश तुळशीराम पाटील, सहा. पोउपनि. महेंद्र सुभाष वर्मा, पोहवा. मुदस्सर मुस्ताक दांडेकर, पोहवा. पराग कमळाकर म्हात्रे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील त्यांचा गौरव केला.