पालघर: वसई विरार शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यालयात आयुक्ता तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्य गीताचे गायन करण्यात आले व प्रतिज्ञा घेण्यात आली. आयुक्तांनी यावेळी महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या योजनांबद्दल उपस्थित त्यांना माहिती दिली. याप्रसंगी महानगरपालिकेचे,अधिकारी,कर्मचारी, मान्यवर उपस्थित होते.