पालघर: कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कोळगाव येथे शुभारंभ
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू हे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अधिकारी कर्मचारी, मान्यवर, नागरिक उपस्थित होते. ओला व सुका कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकून पालकमंत्री व मान्यवरांनी अभियानाचा शुभारंभ केला.