पालघर: पालघर जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आले ध्वजारोहण
पालघर जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.