समुद्रपूर: आरंभा येथे गावठी मोहा दारू विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई, १६ लिटर मोहा दारू जप्त
समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी आरंभा येथे गावठी मोहा दारू विक्री विरोधात कारवाई करीत १हजार ६०० रुपये किमतीची गावठी मोहा दारू व २०० रुपये किमतीची प्लास्टिक डबकी असा एकूण १८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विरोधात समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडून प्राप्त झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.