समुद्रपूर: दहशत माजविणाऱ्या उदमांजराला गिरड येथील दुकानात जेरबंद करून वनविभागाने सोडले मोहगाव जंगलात
वर्षभऱ्यापासून गिरड पोलीस स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेला उदमांजर शेजारच्या घरात घुसून दहशत पसरवीत असल्याने नागरिक हैराण झाले होते.व्यापार संकुल चाळीत हा उदमांजरला पकडण्यात आल्याने परिसरातील कुटुंबियांची दहशतीतून सुटका झाली आहे.कित्येक दिवसापासून या उदमाजराला पकडण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी वन विभागाकडे केली होती. मात्र रात्रीच्या वेळीस घरात घुसणारा उदमाजर पकडणे जिकरीचे झाले होते. घरात लहान मुल, महिला या उदमाजराला पाहून भयभीत होत होते.