समुद्रपूर: शहर पोलिसांची अवैध दारू विक्री विरोधात तिन ठिकाणी धडक कारवाई: पाच हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपूर शहरात पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात अवैध दारू वाहतूक व विक्री विरोधात रामनगर २ हजार ४५० रुपये कींमतीची २२ लिटर मोहा दारू,तर वायगाव हळद्या येथे १ हजार ८०० रुपये किमतीची देशी दारू, समुद्रपूर शहरात १ हजार २०० रुपये किमतीची देशी दारू असा तिन्ही ठिकाणावरून असा एकूण ५ हजार ४५० रुपये किमतीचा देशी व गावठी मोहा दारू साठा जप्त करून ४ गुन्हा दाखल केला हि कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, पोलीस कर्मचारी रामदास चकोले यांनी केली