पालघर: खामलोली येथे दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
पालघर तालुक्यातील खामलोली येथे दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. रुपेश कमडी यांनी त्यांची दुचाकी घरासमोर अंगणात पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने अंगणात पार्क केलेली दुचाकी चोरून चोरटा पसार झाला आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय साहितेच्या कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत.