धावत्या लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा अलर्ट मोड; कल्याण स्थानकावर कडेकोट बंदोबस्त तैनात
कल्याण - अंधेरी बोरिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण उपनगरी रेल्वे मार्गावर सतर्कता वाढवली आहे. कल्याण रेल्वे पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडवर आले असून कल्याण रेल्वे स्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयित प्रवाशांची झडती घेतली जात आहे. प्लॅटफॉर्म, प्रवेशद्वार आणि लोकल गाड्यांमध्येही पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
Kalyan, Thane | Jun 26, 2026