तोंडार येथील महात्मा बसवेश्वर मंडळाचा १५ वर्षांचा अखंड सेवायज्ञ; ५२ रक्तदात्यांचे केवळ शासकीय रक्तपेढीलाच रक्तदान
तोंडार, ता. उदगीर -येथील श्री महात्मा बसवेश्वर युवा गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सलग १५ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यंदा या शिबिरात *५२ रक्तदात्यांनी* रक्तदान केले असून, महिला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे विशेष वैशिष्ट्य ठरले.
मंडळाने गेल्या १५ वर्षांपासून केवळ लातूर येथील शासकीय रक्तपेढीलाच रक्तदान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. शासकीय रक्तपेढीमध्ये संकलित केलेले रक्त गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध होते, त्यामुळे रक्ताचा व्यापार होऊ नये आणि गरिबांना मोफत रक्त मिळावे, या उद्देशाने मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
यावर्षी रक्तदानासोबतच रस्ता सुरक्षा अभियान राबवत रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी रामेश्वर बिरादार, संदीप बिरादार, सचिन बिरादार, महेश बिरादार, ज्ञानेश्वर लासुरे, ओम बिरादार, रोहित पटवारी, पवन पटवारी, विशाल नावंदे, रुपेश पांडे, गंगाधर पाटील, रामेश्वर कंटे, सागर पांडे, पांडुरंग पांडे, दत्ता पांडे ,केदार भांजी
आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल तालुकाभरातून मंडळाचे कौतुक होत आहे.
Latur, Latur | Sep 19, 2026