पास्ते येथील ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या मळ्यातून अज्ञात चोरट्याने १८ हजारांचे लोखंडी अँगल चोरून नेले. दिलीप देवराम शिंदे (५५) हे शासकीय ठेकेदार असून आव्हाड यांच्या मळ्यात त्यांनी शासकीय कामासाठी लोखंडी अँगल आणून ठेवले होते. चोरट्यांनी संधी साधत अँगल चोरून नेले. याप्रकरणी त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.