नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासजवळ एका भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने रामदास रामकृष्ण पोटे (रा. खिरविरे, ता. अकोले) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश साबळे गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातानंतर ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला.