समृद्धी महामार्गावर इंधन चोरी करणाऱ्या टोळीने थेट पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली. इंधन चोरीनंतर पलायन करताना चोरट्यांनी पोलिसांच्या शासकीय बाह्यावर दगडफेक केली. या थरारक पाठलागात महामार्ग पोलिसांचे वाहन नुकसानग्रस्त झाले असून दोन कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.