शहादा: प्रेस मारुती मंदिराजवळ ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला खासदार हिना गावित यांनी भेट देऊन केली पाहणी
शहादा शहरातील प्रेस मारुती मंदिराजवळ ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनावेळी खासदार डॉ. हिना गावित भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार हिना गावित यांच्या हस्ते आदर्श शेतकरी, कृषी केंद्र चालक, शेतकरी गटांना ॲग्रोवर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी शेतकरी व ॲग्रोवर्ल्ड कंपनीचे शैलेंद्र चव्हाण आधी उपस्थित होते.