पालघर: प्रगतीनगर परिसरात 35 वर्षीय व्यक्तीची हत्या; तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तुळींज पोलीस ठाणे हद्दीत 35 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रगतीनगर परिसरातील हिंदुस्तान कॉलनी येथे राहणाऱ्या अंबर राशीद उर्फ गुड्डू खान याची डोक्यात हातोडीने आणि फरशीने वार करून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.