यशाचा नवा विक्रम! कोनाळे क्लासेसच्या ७ विद्यार्थिनींना MBBS; ५ जणींना शासकीय मेडिकल कॉलेज
३५ विद्यार्थ्यांच्या छोट्या बॅचमधून ७ जणींचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार
उदगीर (प्राईम लाईव्ह न्युज नेटवर्क), दि. २३ :उदगीर येथील नामांकित कोनाळे कोचिंग क्लासेसने NEET परीक्षेत पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची मोहर उमटवली आहे. क्लासेसच्या अवघ्या ३५ विद्यार्थ्यांच्या मर्यादित बॅचमधून तब्बल ७ विद्यार्थिनींनी MBBS प्रवेश मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. यातील ५ विद्यार्थिनींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) प्रवेश मिळाला आहे.
यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये प्रणाली बुरटे हिने बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे येथे प्रवेश मिळवला असून शिझा शेख हिला GMC परभणी, श्रद्धा मुळे हिला GMC अकोला, तर यशश्री मुळे हिला GMC धाराशिव येथे प्रवेश मिळाला आहे. तसेच प्रतीक्षा माशीमोडे हिची कोप्पल मेडिकल कॉलेज कर्नाटक, अर्चना धमणे हिची अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर आणि रिया सुडे हिची महेश्वरा मेडिकल कॉलेज पटणचेरू येथे निवड झाली आहे.
३५ पैकी ७ विद्यार्थिनी MBBS ला पात्र ठरल्याने कोनाळे क्लासेसचा निकाल टक्केवारीच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरला असून नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक लक्ष आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन हेच या यशाचे गमक असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे.
या उत्तुंग यशाबद्दल कोनाळे कोचिंग क्लासेसचे मुख्य संचालक प्रा. व्ही. डी. कोनाळे सर आणि उदगीर शाखेचे संचालक श्री. आबा कदम सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
---
*Hashtags:*
#KonaleClasses #UdgirNews #NEET2026 #MBBS #GMC #PrimeLiveNews
Latur, Latur | Sep 23, 2026