सेलू: हिंगणी-शिवनगाव रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाची जनावरांना धडक; 6 गायी जागीच ठार तर 1 गाय गंभीर जखमी
Seloo, Wardha | Sep 27, 2024 हिंगणीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या आयसर मालवाहू वाहनाने चरण्यासाठी जात असलेल्या जनावरांना जबर धडक दिली. त्यात 6 जनावरे जागीच ठार झाले. तर 1 गाय जखमी झाली. धडक लागल्यानंतर मालवाहू गाडी पुलावरून नाल्यात पडली. सुदैवाने गाडीतील कुणालाही इजा झाली नाही. ही घटना हिंगणी नजीक हिंगणी-शिवणगाव रोडवर ता. 27 शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तक्रार प्राप्त न झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सेलू पोलिसांकडून सांगण्यात आले.