कब्रस्तानांच्या प्रश्नावर अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुस्लिम समाजाला दिलासा!
केडीएमसी आयुक्त गोयल यांचे तीन ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन!
कचोरे, टिटवाळा आणि मांडा येथे कब्रस्तानासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक निर्णय;
मुस्लिम समाजाचे प्रतिनिधींनी मांडले काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी ,आयुक्त अभिनव गोयल यांचे आभार
मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी KDMC प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेला काही दिवसांपूर्वी मयत महिलेला दफन करण्यावरून वाद पेटला होता. दफन करण्यासाठी जागा उपलब्ध होऊ न शकल्याने मुस्लिम समाजाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती तसेच दफनभूमीसाठी महापालिकेने आरक्षित भूखंड ताब्यात द्यावेत अशी मागणी केली होती .कब्रस्तानांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजीत गोयल यांनी तातडीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत
Kalyan, Thane | Nov 16, 2026