Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly

हिंगणा: वानाडोंगरीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार भरउन्हात जनतेचा जीव धोक्यात एजन्सीवर गुन्हे दाखल करा

Hingna, Nagpur | Mar 31, 2026
एकीकडे कडाक्याचे ऊन आणि दुसरीकडे घरपोच सिलिंडरसाठी चाललेली वणवण ! वानाडोंगरी परिसरात गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरउन्हात होरपळून निघत आहेत. घरपोच सिलिंडर देण्याऐवजी लोकांना रांगेत उभे करून छळणाऱ्या एजन्सी संचालकांवर थेट गुन्हे दाखल करा, असा आक्रमक इशारा वानाडोंगरी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती बालू मोरे आणि नितीन साखळे यांनी दिला आहे. भारत आणि इंडेन गॅसची सेवा सुरळीत असताना एचपी गॅस एजन्सीने घरपोच वितरणाच्या गाड्या जाणीवपूर्वक बंद केल्याचा आरोप होत आहे.