सावनेर: इंद्रजीतसिंह बावरी हत्याकांडाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करा; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
Savner, Nagpur | Aug 19, 2026 नांदेड येथे ऑल सिख सिकलीगर असोसिएशनचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीतसिंह बावरी यांचे चिरंजीव स्व. इंद्रजीतसिंह बावरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याच्या घटनेची उच्चस्तरीय विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी. तसेच आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी करण्यात आली