भिवापूर: बॉईज हायस्कूल एज्युकेशन सोसायटी भिवापूर येथे माजी आमदार सुधीर पारवे यांनी साधला पदवीधरांशी संवाद
आज बॉईज हायस्कूल एजुकेशन सोसायटी, भिवापूर येथे भेट देऊन पदवीधर मतदारांशी संवाद साधला. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकर कोहळे यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. पदवीधरांचे प्रश्न, अपेक्षा आणि भविष्याच्या संधी यांवर संवाद साधत निवडणुकीच्या अनुषंगाने जनसंपर्क अधिक बळकट करण्यावर भर दिला. यावेळी श्री अनिल समर्थ, श्री विवेक ठाकरे व अनेक पदाधिकारी सोबत उपस्थित होते.