छप्पर फोडून दागिन्यांच्या दुकानात चोरी! 8 तास आत राहून ₹14 कोटींचं सोनं अन् ₹14 लाख रोकड लंपास
मथुराच्या कोसी कलान येथील एका दागिन्यांच्या दुकानात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. एका मुखवटाधारी व्यक्तीने छप्पर फोडून दुकानात प्रवेश केल्याचे सांगितले जात असून, तब्बल आठ तास दुकानात राहून सुमारे ₹14 कोटींचे सोने आणि ₹14 लाखांची रोकड घेऊन फरार झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी दुकानाबाहेरील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चोरीत दुकानातीलच एखाद्या व्यक्तीचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून एका माजी कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या संशयाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
🚨 दागिन्यांच्या दुकानात ₹14 कोटींची चोरी!
😱 8 तास दुकानात राहून सोनं लंपास
🔥 छप्पर फोडून मुखवटाधारी चोराचा प्रवेश
👮 माजी कर्मचाऱ्यावर संशय? CCTV तपास सुरू
#Mathura #KosiKalan #JewelleryShop #GoldRobbery #CrimeNews #CCTV #Robbery #UttarPradesh #UPNews #BreakingNews #CrimeUpdate
Pune City, Pune | Sep 15, 2026