महात्मा फुले मंडई परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू असताना पथारी व्यावसायिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. कारवाईदरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला होत असेल, तर प्रशासन यावर कठोर भूमिका कधी घेणार? मंडई परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना महापालिकेला नेमका कोणाचा दबाव आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
#PuneNews #MahatmaPhuleMandai #PMC #EncroachmentDrive #timesofMaharashtraNews
Pune City, Pune | Sep 15, 2026