हवेली: काळेवाडी परिसरातील विजयनगरमध्ये चोरट्यांनी दुकान फोडुन १३ तोळे सोने व रोख रक्कम केली गायब, सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Nov 30, 2025 काळेवाडी येथे शॉप नंबर १ एसएस सिक्युरिटी, एप्पल प्रकृती बिल्डिंग येथे, फिर्यादी आशिष सुदेश गुंजेकर यांच्या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी अत्यंत कौशल्याने उघडले. काही मिनिटांतच कपाटे फोडली गेली आणि तब्बल १३ तोळे सोनं, आणि रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.